Wednesday 19 August 2020

"कसला हा अहंकार"

कसला गर्व चढलाय माणसांना - पैसा अन् संपत्तीचा 
दोन क्षणाच्या गर्वापोटी माणुस - विसरत चाललाय रक्ताच्या नात्यांना. 
नेमका कसला गंज चढलाय - अहंकारी माणसांच्या बुध्दीला 
माणसं विसरून गेलेत - पुर्वीच्या वाईट क्षणांना 
नेमका कसला अहंकार चढलाय - नसलेली श्रीमंतीचा आव आणायला. 

मातीतून आलेली माणसं शेवटी - मातीतच जाणार
मगं काय कामाचा तुमचा पैसा, 
अन् काय कामाची तुमची संपत्ती,
अन् काय कामाची तुमची श्रीमंती.

# गर्व अहंकार सोडा अन माणसाशी माणसासारखे वागा. 
                                         - Suresh Puri

No comments:

Post a Comment

"कसला हा अहंकार"

कसला गर्व चढलाय माणसांना - पैसा अन् संपत्तीचा  दोन क्षणाच्या गर्वापोटी माणुस - विसरत चाललाय रक्ताच्या नात्यांना.  नेमका कसला गंज चढलाय - अहं...