Monday 27 April 2020

<<<<< विस्मृतीतल गाव>>>>>


भूतकाळात चाचपडत फिरून,
धुळीने झाकोळलेल्या स्मृतीला एका क्षणात,
आठवून देत मनात विस्फारलेल अन् ,
कधीतरी भूतकाळाच्या विस्मृतीत बुडालेल
कधीच न कळलेल गाव.

अंतरमनाच्या पुसटशा स्मृतीवर,
खिळून राहिलेल् माञ,
कधीच कुण्या बापड्यान,
न रेखाटलेल स्वपनाताच विरलेल गावं,
कधी विक्षिप्त तर कधी गुढ वाटणार गाव.

राहून राहून अदभूत अन् तितकेच हवं हवस वाटणार,
तर कधी स्मशान शांत वाटणार गाव,
कुठेतरी हरवलेले अन् प्रकाशझोतात नसणार गाव,
माञ विस्मृतीत कधीतरी लयाला गेलेलं गाव.

                                                      -सुरेश पुरी 

No comments:

Post a Comment

"कसला हा अहंकार"

कसला गर्व चढलाय माणसांना - पैसा अन् संपत्तीचा  दोन क्षणाच्या गर्वापोटी माणुस - विसरत चाललाय रक्ताच्या नात्यांना.  नेमका कसला गंज चढलाय - अहं...